उद्याच्या आदर्श नागरिकांसाठी भारतीय
परंपरा आणि नवनवीन उपक्रमांचे पालन पोषण करणे
आदरणीय पालक,शिक्षक आणि माझेप्रिय विद्यार्थी.
आरुणिविद्या मंदिर या शाळेची मुख्याध्यापिका या नात्याने आमच्या शालेय
समुदायातील आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करताना मला खूप आनंद होत आहे. शाळेत
नवनवीन उपक्रम, कौशल्य,संकल्पना, परंपरा जपणाऱ्या व विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृतीचा
आदर व जोपासना करणे, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधने याबाबत वचनबद्ध
असलेल्या अशा या शाळेचे नेतृत्व करण्याचा मला विशेष अधिकार मिळाला आहे.
आरुणिविद्यामंदिर शाळेत विद्यार्थ्यांना ज्ञानाबरोबरच
सांस्कृतिक वारसा जपणे नवनवीन कौशल्य आत्मसात करणे तसेच विद्यार्थ्यांमध्ये
बौद्धिक ,सामाजिक, भावनिक, मानसिक, भाषिक सृजनशील स्वावलंबन इत्यादी सर्वांगीण विकासाची मूल्ये रुजविणे व
साधनातून अभ्यास त्याचबरोबर शिस्त, स्वच्छता इत्यादी गोष्टी, तसेच सर्व सण समारंभ
उत्सव क्षेत्र भेटी इत्यादी अनेक गोष्टीतून मुलांमध्ये आपली राष्ट्रीय मूल्ये
रुजविण्याचा प्रयत्न केला जातो. नाविन्यतेला महत्व जिज्ञासा निर्माण करणे व जोपासणे, सामाजिकता,
राष्ट्रभावना
निर्माण करणे इत्यादी गोष्टींवर भर दिला जात आहे.
प्रिय विद्यार्थी, पालक आणि शिक्षक,
आपणा सर्वांना माझा नमस्कार.शाळेच्या या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे.आम्हीशाळेतील शिक्षक आणि
कर्मचारी, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी
वचनबद्ध आहोत.शिक्षण केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित नसून, ते विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, नैतिक
मूल्ये आणि जीवनकौशल्ये विकसित करण्याचे साधन आहे, असे
आम्ही मानतो.विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, आम्ही त्यांना योग्य मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देण्यासाठी सदैव तत्पर
आहोत.संस्था,पालक,शिक्षक
आपल्या सर्वांच्या सहकार्याने, आपण आपल्या शाळेला एक
उत्कृष्ट शैक्षणिक केंद्र बनवूया.
आपली नम्र
श्रीमती.छाया माळी.
(मुख्याध्यापिका)